पुण्यात होणार असलेल्या विश्व मराठी संमेलनात यंदा प्रथमच श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा अशा ग्रंथांवर चर्चा होणार असल्याची घोषणा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या उपक्रमाला काल भेट दिल्यानंतर ते बोलत होते. मराठी संस्कृती जगभरात नेण्यासाठी विश्व मराठी संमेलन आयोजित केलं जातं, मात्र या संमेलनाचा पॅटर्न बदलला असून, मराठी संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी या ग्रंथांवर चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं.
Site Admin | January 13, 2025 10:29 AM | पुणे | विश्व मराठी संमेलन