राज्यात १५ ते १६ वर्ष वयोगटातली ९८ टक्के मुलं शाळेत जात असून शाळाबाह्य मुलांचं प्रमाण सर्वात कमी असलेल्या राज्यांमधे महाराष्ट्राचा समावेश होतो. अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेतर्फे राज्याच्या ग्रामीण भागातल्या शाळांचा सर्वेक्षण अहवाल – असर – प्रकाशित करण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. ६ ते १४ वर्ष वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांचं प्रमाण राज्यात ४ दशांश टक्के आहे. देशभरात हे प्रमाण १ पूर्णांक ९ दशांश टक्के आहे. सुमारे ७८ पूर्णांक ४ दशांश टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध असून राज्यातल्या विद्यार्थ्यांची कामगिरी देश पातळीच्या तुलनेत १० टक्क्यांनी सरस आहे, असं यात नमूद केलं आहे.
Site Admin | February 2, 2025 7:43 PM | Maharashtra | School
राज्यात १५ ते १६ वर्ष वयोगटातली ९८ टक्के मुलं शाळेत जात असून शाळाबाह्य मुलांचं प्रमाण सर्वात कमी असलेल्या राज्यांमधे महाराष्ट्राचा समावेश
