नवीन तंत्रज्ञान, रेल्वेसाठी आधुनिक घटक आणि आगामी वर्षात पूर्ण हॉट असलेलं रेल्वेचं विद्युतीकरण यामुळे येत्या पाच ते सात वर्षांत देशातील रेल्वे प्रवासात अभूतपूर्व बदल होणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल कोझिकोडमध्ये एका कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेंतर्गत, 1 लाख कोटी रुपये खर्चून 1334 स्थानकांचा पुनर्विकास केला जात असून त्यापैकी 1100 स्थानकांमध्ये बांधकाम प्रगतीपथावर असल्याचं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. देशातील सर्जन्यतेच्या मदतीने, देशाच्या विविध भागांमध्ये भारतीय नवोपक्रम तंत्रज्ञान संस्थेची निर्मिती करण्याचा सरकारचा विचार असल्याचं वैष्णव यावेळी म्हणाले.