वाहन उद्योग क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत भारतानं जपानला मागे टाकले आहे. देशाच्या वाहन उद्योगाची उलाढाल ७ लाख कोटींवरून २० लाख कोटींवर पोहचली आहे. येत्या काळात ही उलाढाल ५० लाख कोटींवर पोहचविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपुरात एका कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यात सेमिकंडक्टरचा प्रकल्प यावा यासाठी काही कंपन्यांसोबत चर्चा सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात सांगितलं.
Site Admin | July 6, 2024 7:46 PM | जपान | नितीन गडकरी | भारत | वाहन उद्योग क्षेत्र