डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या शेवटच्या सामन्यात भारताने निर्धारित ५० षटकात पाच बाद ४३५ धावा केल्या

महिला क्रिकेटमधे राजकोट इथं भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं आज निर्धारित ५० षटकात पाच बाद ४३५ धावा केल्या आहेत. सलामीवीर प्रतिका रावळनं ठोकलेलं शतक आणि कर्णधार स्मृती मानधनाच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारतानं धावांचा डोंगर उभा केला आहे. रावळनं १२९ चेंडूत १५४ अशी सुरेख खेळी केली तर मानधनानं केवळ ८० चेंडूत १३५ धावा केल्या. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतानं पहिले दोन सामने जिंकून या आधीच २- ० अशी आघाडी घेतली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा