गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातल्या हवाई वाहतूक क्षेत्रानं मोठी प्रगती केली असून जागतिक पातळीवर हे क्षेत्र तिसऱ्या स्थानावर पोहोचल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल सांगितले.
पुण्याच्या लोहगाव विमानतळावर नव्याने उभारण्यात आलेले टर्मिनल मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुलं करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.नव्या टर्मिनलवरून विमान प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवाशाला यावेळी मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला.आगामी काळात देशभरात आणखी २० ते २५ नवीन विमानतळांची उभारणी केली जाणार असल्याचं सांगून मोहोळ म्हणाले.