भारत आगामी काळात रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसोबत संपर्क वाढवेल, या दोन देशातला संघर्ष निवळण्यासाठी हा संपर्क महत्वाचा ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं. जपानमधल्या राष्ट्रीय क्लबमध्ये, वार्ताहरांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढच्या महिन्यातल्या युक्रेन दौऱ्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. भारत आणि युक्रेन तसंच भारत आणि रशिया यांच्यात अधिकाधिक संपर्क होईल, अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. तसंच युद्धाच्या मैदानात रशिया आणि युक्रेन संघर्षावर तोडगा निघणार नाही, असा भारताला विश्वास आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | July 30, 2024 1:27 PM