चित्रपटसृष्टीत लेखकांना योग्य तो मान आणि त्यांच्या कामाचं दाम मिळणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन प्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांनी केलं आहे. २१व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या काल झालेल्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान त्यांना ‘एशियन कल्चर’ या विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. आपल्याकडे उत्तम कलागुणांची खाण आहे.
त्याला योग्य संधी देत आपल्या मातीतल्या प्रादेशिक कलाकृतींसाठी आपण आग्रही राहायला हवं, असं मत त्यांनी मांडलं. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये गीत-संगीताची आवर्जून जपलेली परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीनेही जपली, तर हिंदी चित्रपटही जागतिक पातळीवर नावाजला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यंदाच्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरुवात ‘ब्लॅक डॉग’ या चित्रपटानं झाली. १६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध आशियाई देशांचे चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.