43व्या कनिष्ठ गट राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्याही संघानं सुवर्णपदक जिंकत आपलं वर्चस्व अबाधित राखलं आहे. मुलांच्या संघानं या स्पर्धेच्या इतिहासातला 35 वा विजय नोंदवत त्यांचा सलग 19 वा विजय साजरा केला, तर मुलींच्या संघानं सलग दहावं आणि एकूण 26 वं विजेतेपद पटकावलं. मुंबईच्या महाराणी अहिल्याबाई होळकर क्रीडा स्टेडियमवर या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत जितेंद्र वसावे आणि सुहानी धोत्रे यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वीर अभिमन्यू आणि जानकी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
Site Admin | December 3, 2024 2:36 PM | राष्ट्रीय खो-खो स्पर्धा | सुवर्णपदक