डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दहा वर्षात आसाममधले दहा हजारपेक्षा जास्त युवक शस्त्र त्याग करुन मुख्य प्रवाहात- केंद्रीय गृहमंत्री

गेल्या दहा वर्षात आसाममधले दहा हजारपेक्षा जास्त युवक शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात आले असून आसाम प्रगतीपथावर आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. गोलघाट जिल्ह्यातल्या डेरगाव इथल्या पोलीस अकॅडमीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज अमित शाह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पुढच्या टप्प्याची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली. ही अकॅडमी देशातली सर्वश्रेष्ठ अकॅडमी होईल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

 

रालोआ सरकारने आसाममधे शांतता प्रस्थापित केली असून इथं उद्योगधंदे उभे राहत आहेत, असं शाह म्हणाले. ३ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प आसाम मधे येणार आहेत, यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील असंही शाह म्हणाले.

 

लचित बारफुकन पोलीस अकॅडमीत अत्याधुनिक सुविधा दिल्याबद्दल पोलीस महासंचालक हरमीत सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार मानले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते.

 

३४० एकर वर पसरलेल्या ही अकॅडमी उभारण्यासाठी १ हजार २४ कोटी खर्च येणार आहे. प्रशिक्षणार्थींना सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही बाबींचं ज्ञान मिळावं यासाठी या अकॅडमीची रचना करण्यात आल्याचं इथल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा