डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

तमिळनाडूमध्ये कल्लाकुरिची इथं विषारी दारूचं सेवन केल्यानं ४७ जणांचा मृत्यू

तमिळनाडू च्या कल्लाकुरीची इथल्या विषारी दारु सेवन केल्यानं मृत्यू पावलेल्यांची संख्या आता ४७ झाली आहे. या विषारी दारुमुळे एकूण १६५ जण बाधित झाले होते. यातील ११८ बाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असून इतर बाधितांची तब्येत सुधारत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.एस. प्रसथं यांनी दिली. या प्रकरणी अटक केलेल्या चार दोषींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख तर उपचार घेत असलेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अर्थसहाय्य राज्यसरकारने जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी या प्रकाराबद्दल तीव्र शोक प्रकट केला असून आज मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या प्रकरणी चौकशी आयोग स्थापन करण्यात आला असून बाधितांना हरप्रकारे मदत पोहोचवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

या प्रकरणी दारुची तस्करी करणाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २०० लिटर दारु जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल  जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा