डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशातल्या काही राज्यात तुरळक ठिकाणी उद्या पहाटेपर्यंत राहील दाट धुकं

बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यात तुरळक ठिकाणी आज रात्रीपासून ते उद्या पहाटेपर्यंत दाट धुकं राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. दिल्लीतही दाट धुकं पसरलं असून त्यामुळे रेल्वे आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, चंदिगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागावर ताशी ५५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून मच्छिमारांना या भागात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा