डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नांदेडमध्ये मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

नांदेड इथं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज आढावा घेतला. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातल्या नुकसानाची माहिती सादर केली. या बैठकीनंतर अनिल पाटील, नांदेड तालुक्यातल्या कासारखेडा, आलेगाव आणि निळा या गावांना भेटी देऊन पाहणी करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आज सकाळी नांदेड जिल्ह्यातल्या अतिवृष्टी झालेल्या हदगाव तालुक्याला भेट दिली. प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावेत आणि सरकारनं सरसकट भरीव मदत करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा