सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य ८ जणांनी अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सीबीआयनं सापळा रचून कारवाई केली. मागणी केलेल्या लाचेपैकी ३० लाख रुपये हवाल्यानं स्वीकारले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर, न्यायालयानं वस्तू आणि सेवाकर अधिक्षक आणि सनदी लेखापाल असलेल्या आरोपींना १० सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडी, तर त्यांच्या साथीदाराला न्यायालयीन कोठडी दिली आहे. आरोपींनी तक्रारदाराला बेकादेशीरपणे ताब्यात घेऊन, अटक करण्याची धमकी दिल्याचं तक्रारदारनं म्हटलं आहे.
Site Admin | September 8, 2024 2:17 PM | CBI | Crime