डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशातील औद्योगिक उत्पादक निर्देशांकात यंदाच्या मे महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत 5 पूर्णांक 9 टक्क्यांनी वाढ

देशातील औद्योगिक उत्पादक निर्देशांकात यंदाच्या मे महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत 5 पूर्णांक 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीचा मे महिन्यातील वाढीचा दर 5 पूर्णांक 7 टक्के होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं यासंदर्भातील आकडेवारी काल जाहीर केली. खाणकाम क्षेत्रात दरवर्षी वाढ होत असून यंदा 6 पूर्णांक 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. निर्मिती क्षेत्रात 4 पूर्णांक 6 टक्के तर वीज क्षेत्राचा उत्पादन वाढीचा दर 13 पूर्णांक 7 टक्के इतका लक्षणीय नोंदवला गेला. मे महिन्याच्या काळवाढीतील उत्पादन ग्राहक आकडेवारी, भांडवली वस्तु विभागात 2 पूर्णांक 5 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये 12 पूर्णांक 3 टक्के, दैनंदिन वापराच्या ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये 2 पूर्णांक 3 टक्के आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधाशी संबंधित वस्तूंच्या उपभोक्ता दरात 6 पूर्णांक 9 टक्के वाढ झाली आहे. तर प्राथमिक वस्तूंच्या ग्राहक दरात 7 पूर्णांक 9 टक्के वाढ झाली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा