लेबनॉनमध्ये सक्रीय असलेल्या हेजबोल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इब्राहिम अकील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या बातमीवर हेजबोल्लानं शिक्कामोर्तब केलं आहे. दाहियेह भागात इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १४ जण ठार, तर ६६ जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली. दाट लोकसंख्येच्या भागात इस्रायलनं केलेल्या या कारवाईचा लेबनॉनचे प्रधानमंत्री नजीब मिकाती यांनी निषेध केला आहे. प्रत्युत्तरादाखल हेजबोल्लानं इस्रायलच्या दिशेनं शंभरपेक्षा जास्त क्षेपणास्त्रं डागली. या हल्ल्यात कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान, इस्रायल आणि हेजबोल्ला यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक पार पडली.
Site Admin | September 21, 2024 2:26 PM | ibrahim akil | Lebanon
लेबनॉनमध्ये सक्रीय असलेल्या हेजबोल्ला दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इब्राहिम अकील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार
