डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला

झारखंडमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी काल, एनडीए आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या निवडणूक सभा पार पडल्या. हजारीबाग इथल्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कारभारावर टीका करत नागरिक त्यांच्या चुकीच्या कारभारावर नाखूष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

तर झारखंड मुक्ती मोर्चाच्या कल्पना सोरेन यांनी भाजपवर टीका करत त्यांच्या सत्ताकाळात राज्य पिछाडीवर गेल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस, आरजेडी, एजेएसयू आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनीही राज्याच्या विविध भागात निवडणूक रॅलींना संबोधित केले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा