ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीत निर्णायक बहुमत मिळावून मजूर पक्ष दमदार विजयाकडे वाटचाल करत आहे. मतमोजणी अद्याप संपलेली नाही तरीही आतापर्यंत ६५० पैकी ३२६ जागा मजूर पक्षाने जिंकल्या आहेत. जवळपास दशकानंतर मजूर पक्षाला जनादेश मिळाला आहे. जनतेने बदल घडवण्याच्या उद्देशाने मतदान केलं आहे असं मजूर पक्षाचे नेते कीयर स्टार्मर यांनी म्हटलं आहे. दरम्यान मावळते प्रधानमंत्री आणि हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
Site Admin | July 5, 2024 1:51 PM | Britain | Labor Party