बिहारमध्ये गेल्या २४ तासात वीज अंगावर पडून किमान आठ जणांचा मृत्यू झाला. पटना आणि औरंगाबाद इथं प्रत्येकी ३ आणि नावदा आणि सरन इथं प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना चार लाख रूपयांच्या अर्थसहाय्याची घोषणा केली आहे. नागरिकांनी पाऊस पडत असताना शेतीच्या कामासाठी घराबाहेर पडणं टाळावं असा सल्ला हवामान विभागानं दिला आहे.
Site Admin | August 3, 2024 1:01 PM | Heavy rain
वीज अंगावर पडून बिहारमध्ये 8 जणांचा मृत्यू
