युरोपात २०२३ मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे ४७ हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. बार्लिनो जागतिक आरोग्य संस्थेनं याबाबत अहवाल तयार केला आहे. दक्षिण युरोपातल्या देशांना जास्त फटका बसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गेलं वर्ष सर्वाधिक उष्ण असल्याचं त्यात म्हटलं आहे. ग्रीस, बल्गेरिया, इटली आणि स्पेनमध्ये मृत्यूचा दर सर्वाधिक असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
Site Admin | August 13, 2024 9:52 AM | heat wave