आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा खूप चांगली झाल्याचं मत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांनी मांडलं आहे. २०२७पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ ते ६ वर्षांमध्ये देशात कोट्यवधी नवे रोजगार निर्माण करावे लागतील, असंही गोपीनाथ यांनी नमूद केलं. उत्पादनांचा व्यक्तिगत वापर पूर्वपदावर येण्याची आणि कृषी उत्पादन वाढण्यासाठी चांगला पाऊस होण्याची नाणेनिधीची अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | August 17, 2024 2:23 PM | financial year | Geeta Gopinath | Growth of Indian economy | Indian | indian Economy
२०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा चांगली झाल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांचं मत
