नमो ड्रोन दीदी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्रसरकारने मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केंद्र सरकारच्या पातळीवर कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग तसंच ग्रामविकास आणि खतं विभागाच्या सचिवांच्या समिती या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना ड्रोन खरेदी करण्याकरता, ड्रोन आणि त्यासाठी आवश्यक साधनांच्या किंमतीच्या ८० टक्के रक्कमेचं सहाय्य दिलं जाणार आहे, मात्र याची मर्यादा जास्तीत जास्त आठ लाख रुपयां पर्यंत असणार आहे. यासोबतच महिला बचत गटातील एका सदस्याची १५ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल आणि त्यांना ड्रोन पायलट म्हणून तसचं पोषक आणि कीटकनाशक फवारण्यासंबंधीचं अतिरिक्त प्रशिक्षण दिलं जाईल