डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 5, 2025 8:11 PM

printer

फिलिपिन्सच्या उपराष्ट्रपती सारा दुतेर्ते यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव दाखल

फिलिपिन्सच्या उपराष्ट्रपती सारा दुतेर्ते यांच्याविरुद्ध संसदेत आज महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात आला. राष्ट्रपतींसोबत राजकीय मतभेद असलेल्या दुतेर्ते यांच्या विरुद्ध सदस्यांनी यावेळी मतदान केलं. दुतेर्ते यांच्या विरुद्ध महाभियोग चालवण्यासाठी संसदेच्या २१५ सदस्यांनी मतदान केल्याचं सरचिटणीस रेजिनाल्ड वेलास्को यांनी सांगितलं. यामध्ये गेल्या वर्षी राष्ट्रपती, त्यांच्या पत्नी आणि सभागृहाचे सभापती मार्टिन रोमुआल्डेझ यांंना त्यांनी दिलेली जीवे मारण्याची धमकी, त्यांच्या कार्यालयाच्या गुप्तचर निधीच्या वापरातील अनियमितता आणि दक्षिण चीन समुद्रात चिनी आक्रमणाला तोंड देण्यात आलेलं अपयश यामुळे त्यांच्यावर चार महाभियोग प्रस्ताव दाखल झाले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा