डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 13, 2024 9:15 PM | पाऊस

printer

मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी

मुंबई, पुणे आणि आसपासच्या भागात आज सकाळपासून पाऊस सुरु असून मुंबईत पावसाने जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवरील काही गाड्या उशीराने धावत आहेत. हवामान विभागानं मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे.  पावसामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी सह अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलं आहे. अंधेरी, मिलन सबवे आणि मालाड सबवे मध्ये पाणी साचल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुणे विभागात हलका ते मध्यम पाऊस सुरु असून उदयाही असाच पाऊस पडणार असून त्यामुळे  हवामान विभागानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, पालघर, बोईसर, जव्हार सह अनेक भागांत जोरदार पाऊस सुरु असून नद्यांनाही पूर आला आहे. सुर्या नदी दुथडी भरून वाहात असून डहाणूतल्या कंक्राडी रेल्वे पुलाखाली पाणी भरल्यानं डहाणू कोसबाड रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असल्यानं दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ठाणे जिल्ह्यात गेली दोन दिवस काहीशी उघडीप घेतलेल्या पावसानं शुक्रवारी रात्री पासून ठाण्यात पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. आज  सकाळ पासूनच पावसानं आपला जोर कायम ठेवला आहे. त्यामुळं शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे.  

ठाणे जिल्हयात भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि शहापूर या भागातही पावसाची संतत धार सुरु आहे. उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबलं असून मद्रासी पाड्यात अनेक घरात पाणी शिरलं आहे  तर वालधुनी नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे. अकोल्यातही आज पावसानं हजेरी लावली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा