गेल्या चोवीस तासात, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पड्ण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.