भारतीय हवामान विभागानं आज आंध्र प्रदेशच्या किनारी भागांमध्ये, यानम, तेलंगणा आणि कर्नाटकच्या अंतर्गत परिसरामध्ये ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशातही वादळ आणि विजांचा कडकडाट होणार आहे. गुजरातच्या किनारी भागात उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. वायव्य भारतात पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसनं वाढ होईल, तर मध्य भारतात कमाल तापमानात २ ते ४ अंशांनी आणि गुजरातमध्ये २ ते ३ अंश सेल्सिअयसनी वाढ होण्याची शक्यता आहे.
Site Admin | March 24, 2025 3:10 PM | IMD
आंध्र प्रदेशच्या किनारी भागांमध्ये पावसाचा अंदाज
