येत्या ३-४ दिवसात महाराष्ट्र, वायव्य भारत, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा चंदीगढ, दिल्ली आणि पंजाबमधे पुढचे चार-पाच दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.
पूर्व भारतात येत्या १० तारखेपर्यंत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व आणि ईशान्य भारत तसंच कर्नाटक आणि आंध्रप्रदेश किनारपट्टीवर पुढचे पाच दिवस सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. अंदमान निकोबारमधे पुढचे सहा ते सात दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.