भारतात यंदा एप्रिल ते जून हा कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामानशास्त्रविभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा यांनी ऑनलाईन पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. देशाच्या मध्य, पूर्व आणि वायव्य भागात या काळात सहसा ४ ते ७ उष्णतेच्या लाटा येतात. यंदा त्यांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता असून केवळ तुरळक ठिकाणचे अपवाद वगळता तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरयाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, छत्तीसगढ, तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधे, तसंच कर्नाटक आणि तमिळनाडूच्या उत्तर भागात ही स्थिती राहील. या काळात वाढलेल्या उष्म्यामुळे विजेची मागणी देखील ९ ते १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
Site Admin | March 31, 2025 9:13 PM | IMD
भारतात यंदा एप्रिल ते जून कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता-IMD
