वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागात आज मेघगर्जनेसह वादळी वारे आणि गारपिटीचा अंदाज असून, हवामान विभागानं या भागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात अतिवृष्टी आणि गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
राजधानी दिल्लीमध्ये आज दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर शहराच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.