भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजांच्या अचूकतेत गेल्या दहा वर्षांत ४० ते ५० टक्क्याची वाढ झाल्याची माहिती विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे. अतिवृष्टीच्या अंदाजाची अचूकता देखील ६० टक्क्याहून ८० टक्क्यापर्यंत वाढली आहे. या विभागाकडे सध्या साडेपाचशे विभागीय वेधशाळा, दोन हजार स्वयंचलित हवामान केंद्र आणि ३९ ठिकाणी डॉप्लर रडार प्रणाली कार्यरत आहेत, असंही ते यावेळी म्हणाले. पुढच्या दोन वर्षांत आणखी ३४ रडार बसवले जातील ज्यामुळे पुढच्या पाच वर्षांत याच अंदाजांच्या अचूकतेत १० ते १५ टक्के वाढ होईल, असा विश्वासही महापात्रा यांनी व्यक्त केला आहे.
Site Admin | December 24, 2024 12:50 PM | IMD
IMD अंदाजांच्या अचूकतेत गेल्या दहा वर्षांत ४० ते ५० टक्क्याची वाढ
