गेल्या चोवीस तासात, राज्यातल्या सर्व विभागांमधे तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. सर्वात कमी किमान तापमान ब्रम्हपुरी इथं १४ पूर्णांक ५ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.
येत्या दोन दिवसात, राज्यातल्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.