मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा ई-मोबिलिटी या विषयातला ऑनलाइन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम येत्या मार्चपासून सुरू होणार आहे. १८ महिन्यांचा हा अभ्यासक्रम ‘ग्रेट लर्निंग’ या संस्थेच्या सहकार्याने आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी तयार केला आहे. या क्षेत्रात काम करणारे, वैज्ञानिक, संशोधक यांना या अभ्यासक्रमाचा लाभ होईल. यात इलेक्ट्रिक वाहनांचं डिझाइन, बॅटरी तंत्रज्ञान यासह इतर विषयांवर लक्ष केंद्रित केलं आहे.
Site Admin | January 14, 2025 1:21 PM | IIT BOMBAY
ई-मोबिलिटी या विषयातला ऑनलाइन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम मार्चपासून सुरू होणार
![ई-मोबिलिटी या विषयातला ऑनलाइन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम मार्चपासून सुरू होणार](https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2025/01/download-1-1-1.png)