गोव्यात ५५वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून आज दिवसभरात विविध विषयांवरचे ४० चित्रपट दाखवण्यात येत आहेत. यामध्ये उत्तमोत्तम हिंदी आणि प्रादेशिक चित्रपट दाखवण्यात येत आहेत. इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा या दालनाचेही उद्घाटन झाले असून यात २५ फिचर आणि २० नॉन फिचर चित्रपट दाखवण्यात येत आहेत. महोत्सवात चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच इतरही कार्यक्रम सुरु आहेत. जगभरातील चित्रपट कर्मी त्यांच्या मास्टरक्लासच्या माध्यमातून तरुणांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहेत. चित्रपट निर्मिती उलगडून दाखवणारे विविध परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. इफ्फीमधील फिल्म बाजारचे हे १८ वे वर्ष असून चित्रपट निर्मितीत येणाऱ्या तरुणांना नामांकित व्यावसायिकांबरोबर संपर्क साधण्याची संधीही मिळालेली आहे.