इफ्फी अर्थात भारतीय चित्रपट महोत्सवातल्या चौथ्या क्रिएटिव्ह माइंड्स टुमारो कार्यक्रमाचं आज उद्घघाटन झालं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून १३ प्रकारच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या १०० तरुण चित्रकर्मींची निवड करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजु यांनी यावेळी सांगितलं. याद्वारे तरुण चित्रपट निर्मितीच्या विविध क्षेत्रातलं आपलं कौशल्य जगासमोर आणतील. फिल्म बाजारच्या माध्यमातून त्यांच्यासाठी जागतिक स्तरावर काम करण्याची संधी मिळेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
आज दिवसभरात विविध विषयांवरचे ४० चित्रपट दाखवण्यात आले. इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा या दालनाचंही उद्घाटन झालं असून यात २५ फिचर आणि २० नॉन फिचर चित्रपट दाखवण्यात आल्या.