जगभरातल्या नवोदित चित्रपटकर्मींच्या असामान्य योगदानाची दखल घेण्यासाठी ५५ व्या इफ्फी या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात पदार्पणातल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. १० लाख रूपये रोख, चांदीचा मोर आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या श्रेणीसाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. जिप्सी हा शशि चंद्रकांत खंदारे यांचा मराठी चित्रपट आणि तेलगु लेखक दिग्दर्शक इमानी व्ही एस नंद किशोर यांचा ३५ छिन्ना कथा काडू या चित्रपटांचा त्यात समावेश आहे. गोव्यात पणजी इथं २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत इफ्फी महोत्सव होणार आहेत.
Site Admin | November 15, 2024 8:12 PM | IFFI2024 | IFFI55