मालवण इथल्या राजकोट किल्ला परिसरातील पुतळा कोसळल्या प्रकरणी, अटकेत असलेला मूर्तीकार जयदीप आपटे याला स्थानिक न्यायालयानं २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपटेच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला काल मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
Site Admin | September 14, 2024 12:20 PM