अरबी समुद्राच्या उत्तर भागात बुडणाऱ्या अल पिरानपीर या भारतीय जहाजावरच्या १२ कर्मचाऱ्यांची काल भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने सुटका केली. यंत्रचलित असलेलं हे जहाज गुजरातच्या पोरबंदर इथून निघालं होतं आणि ते इराणमध्ये बंदर अब्बास इथे जात होतं. काल सकाळी समुद्रातील खडकाळ पृष्ठभागाला धडकल्याने ते बुडायला लागलं. जहाजावरच्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे.
Site Admin | December 5, 2024 7:36 PM