डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 19, 2024 12:25 PM | ICG DG Rakesh Pal

printer

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं निधन

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं काल चेन्नई इथं हृदयविकारानं निधन झालं. ते एकोणसाठ वर्षांचे होते. तटरक्षक दलाच्या सागरी प्रतिसाद केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते चेन्नई इथं गेले होते. ३४ वर्षांच्या सेवेदरम्यान त्यांनी तटरक्षक दलाच्या आधुनिकीकरणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केलं आहे. पाल हे समर्थ आणि कामाशी बांधिलकी असलेले अधिकारी होते, त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय तटरक्षक दलानं भारताच्या सागरी सीमांची सुरक्षा बळकट करण्यात मोठा पल्ला गाठल्याचं राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा