महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना बांग्लादेश आणि प्रथमच खेळणारा स्कॉटलंडचा संघ यांच्यात होणार आहे . सामन्याला दुपारी साडेतीन वाजता सुरुवात होईल. भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडसोबत होणार आहे. येत्या २० ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत दहा संघ उतरले आहेत. या स्पर्धेत मागील तिनही वेळा ऑस्ट्रेलियानं विजेतेपद मिळवलं असून भारतीय संघाला अद्याप एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. यंदा मुख्य स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांना पराभूत केलं.
Site Admin | October 3, 2024 1:38 PM | ICC T20 | Women Cricket
महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजाह इथं सुरुवात
