आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं ९०४ गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे. यासोबतच त्यानं कोणत्याही भारतीय गोलंदाजाने मिळवलेल्या सर्वाधिक गुणांच्या विक्रमात फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी केली. ब्रिस्बेन कसोटीत ९४ धावांच्या मोबदल्यात ९ गडी टिपण्याच्या कामगिरीमुळे बुमराहनं १४ गुण मिळवून पहिलं स्थान कायम राखलं आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या मेलबर्न कसोटीत हा विक्रम मोडण्याची संधीही बुमराहला मिळणार आहे
Site Admin | December 25, 2024 7:46 PM | Jasprit Bumrah
आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमराह अग्रस्थानी
