भारत आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघादरम्यान खेळाला जाणारा आयसीसी चॅम्पियनशिप मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना उद्या वडोदराच्या कोटाम्बी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतानं २११ धावांनी जिंकला असल्यानं दुसरा सामना जिंकण्यासाठी संघ उत्सुक आहे.
हरमप्रितकौरच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा स्मृती मंधाना हिच्याकडे सोपवली आहे. नवी वेस्ट इंडिजबरोबर झालेल्या टी २० मालिकेत स्मृतीनं दमदार कामगिरी केली होती. ही मालिका भारतानं २-१ अशी जिंकली होती.