आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत सुरू असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतापुढं विजयासाठी २६५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र सामन्यातले ३ चेंडू बाकी असताना त्यांचा डाव २६४ धावांवर संपला. कर्णधार स्टीव्हन स्मिथनं सर्वाधिक ७३, तर ॲलेक्स कॅरेनं ६१ धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे मोहम्मद शमीनं ३, तर वरुण चक्रवर्ती आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या ९ षटकात २ बाद ४३ धावा झाल्या होत्या.
ज्येष्ठ क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचं काल निधन झालं. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय संघ काळीफित लावून मैदानात उतरला आहे.
या स्पर्धेतल्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना उद्या लाहोर इथं न्यूझिलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. दोन्ही उपांत्य सामन्यांमधून विजेते ठरलेल्या संघांमधे येत्या ९ तारखेला अंतिम सामना होईल.