चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज लाहोरमध्ये सुरु असलेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियापुढं विजयासाठी २७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, आणि निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून २७३ धावा केल्या. सादीकुल्लाह अटलनं ८५, अजमतुल्ला उमरझईनं ६७ धावा केल्या, ऑस्ट्रेलियातर्फे बेन ड्वारशुइसनं ३, तर स्पेन्सर जॉन्सन आणि अॅडम झांपा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ६ षटकात १बाद ६४ धावा झाल्या होत्या.