आयसीसी पुरुषांच्या चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं अफगाणिस्ताननं इंग्लंडवर आठ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी 326 धावांचं आव्हान पेलताना इंग्लंडचा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत सर्वबाद 317 धावा करु शकला. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झदरान यानं या स्पर्धेतील विक्रमी 177 धावा केल्या. या पराभवामुळं इंग्लंडचा संघ या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. स्पर्धेत अद्याप खातं उघडू न शकलेल्या पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील अंतिम गट सामना आज रावळपिंडी इथं होणार आहे.
Site Admin | February 27, 2025 9:23 AM | ICC Champions Trophy
चँपियन्स करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानची इंग्लंडवर ८ धावांनी मात
