आयसीसी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत सुरु असलेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतापुढं विजयासाठी २४२ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सोद शकीलनं सर्वाधिक ६२ धावा, तर कर्णधार महंमद रिझवाननं ४६ धावा केल्या. खुशदिल शाहानं ३८ धावांच योगदान दिलं. भारतातर्फे कुलदीप यादवनं ३, तर हार्दिक पंडयानं २ गडी बाद केले.