नवव्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतला सलामीचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघांत सुरू आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या बिनबाद ३९ धावा झाल्या आहेत.
दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि दुबईत खेळले जाणार आहेत. रोहीत शर्माच्या नेतृत्वातल्या भारतीय संघाचा पहिला सामना उद्या दुबईत बांग्लादेशविरुद्ध होणार आहे.