चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ब गटात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. पाकिस्तानमध्ये लाहोर इथं हा सामना होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल.
स्पर्धेत काल कराची इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानवर १०७ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात पहिली फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं, रायन रिकेल्टन याच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या पहिल्या शतकाच्या जोरावर ६ बाद ३१५ धावा केल्या. मात्र विजयासाठी ३२६ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ ४३ षटकं आणि ३ चेंडुंमध्ये २०८ धावांमध्येच माघारी परतला. अफगाणिस्तानच्या वतीनं रहमत शहा यानं सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. या सामन्यात शतकवीर रायन रिकेल्टन याला सामनावीराचा पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं.
स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दुबई इथं दुपारी अडीच वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतानानं आपल्या सलामीच्या सामन्यात बांग्लादेशावर विजय मिळवला होता, तर पाकिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंड विरोधात पराभूत व्हावं लागलं होतं.