माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच ईफ्फीमध्ये नवोदित तरुण भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी एक नवीन विभाग सुरू केला आहे. “सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभाग २०२४” असे या विभागाचे नाव आहे. या नव्या दालनात ईफ्फी चित्रपट महोत्सव यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होत आहे. या नवोदित दिग्दर्शकांच्या दालनाच्या माध्यमातून तरुण चित्रपट निर्मात्यांची सर्जनशील दृष्टी आणि अनोखा कथा मांडणी दृष्टिकोन अधोरेखित होणार आहे. भारतीय चित्रपटात नवीन दृष्टीकोन आणि कथांचे योगदान देणाऱ्या नवीन दिग्दर्शकांचे ५ चित्रपट या दलानात निवडले जाणार आहेत. या दालनाच्या माध्यमातून देशातल्या तरुणांची नवी चित्रपटशैली, कथानके आणि कौशल्याचे दर्शन जगातल्या प्रेक्षकांना घडणार आहे.
Site Admin | September 14, 2024 6:55 PM | IFFI 2024
IFFI २०२४ मध्ये तरुण भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी नवीन विभाग
