टाइम या जगप्रसिद्ध नियतकालिकानं तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या सर्वांत प्रभावी व्यक्तींमध्ये केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना स्थान दिलं आहे. यासंदर्भात टाईमनं प्रकाशित केलेल्या यादीत वैष्णव यांच्या नावाचा शेपर्स या गटात समावेश केला आहे. वैष्णव यांच्या नेतृत्वात येत्या पाच वर्षांत भारत सेमीकंडक्टरच्या उत्पादनात जगातल्या पहिल्या पाच देशांमध्ये येईल, अशी आशा असल्याचंही टाइमनं म्हटलं आहे. वैष्णव यांच्या नावाचा या यादीत समावेश झाल्यानं, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात भारताचं नाव मोठं करण्यात वैष्णव यांनी बजावलेली महत्वाची भूमिका अधोरेखित झाली आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे.
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला, मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन, मार्क झुकेरबर्ग आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचाही या यादीत समावेश आहे.