डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 13, 2024 1:07 PM | I&B | TV channels

printer

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना

खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी आपत्ती किंवा दुर्घटनांची दृश्यं दाखवताना त्यावर घटना घडलेल्या तारखेचा उल्लेख करण्याच्या मार्गदर्शक सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जारी केल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटना घडल्यानंतर वाहिन्यांवर अनेक दिवस बातम्या प्रसारित केल्या जातात, मात्र त्यात घटना झालेल्या दिवसाचीच दृश्यं दाखवली जातात. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये विनाकारण गोंधळ निर्माण होतो आणि भिती पसरते, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटलं आहे. प्रेक्षकांमध्ये गैरसमज पसरू नये यासाठी संबंधित दृश्यं दाखवताना मूळ घटनेची तारीख आणि वेळ ठळकपणे दाखवावी, असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा